‘मोठी माणसे’ : पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळातील ही माणसे आहेत. त्यांच्या जीवननिष्ठेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी आणि दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे

या व्यक्तिचित्रांमधील काकासाहेब गाडगीळांचा एक अपवाद वगळता इतर कोणीही कधीही सत्तेत नव्हते. सत्ता ही आपल्या आयुष्यभराच्या ठरवलेल्या कामासाठी एक पायाभूत आवश्यकता आहे, असे त्यांनी मानलेच नाही. सत्तेसाठी तडजोडी करणे तर सोडून द्या, पण सत्ता जवळ येत असतानाही तिचा अव्हेर केला. काकासाहेब गाडगीळांचा समावेश यात करण्याचे एक कारण आहे. सत्तेमध्ये राहूनसुद्धा ज्यांच्या अंगाला किंवा मनाला सत्ता चिकटलीच नाही.......